जळगाव । माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत असून गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. यातच एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर घणाघाती हल्ला केला आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे
गिरीश महाजन हा माणूस नुसते बडबड करणारा आहे. देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली राहून मोठा झालेला आहे. त्यांचे स्वतःचे कर्तृत्व नाही. त्यामुळे गिरीश महाजन यांना भाव देण्यात काहीच अर्थ नाही. त्यांनी मला बदनाम करण्यासाठी माझ्याविरोधात षडयंत्र रचले होते. त्या सर्व प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार कोण आहे? हे महाराष्ट्राला माहिती आहे. ते म्हणतात, भोसरी भूखंडात खडसेंनी भूखंड घेतला. परंतु आजही तुम्ही भोसरीचा उतारा काढू शकता मूळ मालकाचे नावच त्यावर दिसेल. मी महसूल मंत्री होतो. त्यामुळे मला तेवढी अक्कल होती. गिरीश महाजन यांनी भूखंडासंदर्भात दिलेली माहिती अत्यंत चुकीची आहे, असं खडसे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, तुम्ही म्हणता माझ्या बायकोला हरवले. तुम्ही गद्दारी करून हरवले आहे. बोदवड आणि मुक्ताईनगरनगर पंचायत ही माझी होती. परंतु, तुम्ही फोडाफोडीचे राजकारण केले. पैशांचे आमिष देऊन त्या संस्था ताब्यात घेतल्या.असंही हल्ला खडसेंनी केला.
मी हे मान्य करतो की गिरीशभाऊ दारू पीत नाही. तंबाखू खात नाही. बिडी पीत नाही. त्यांना कुठलीही सवय नाही. मात्र त्यांना एक सवय आहे. त्यांची ती सवय सर्वांना माहीत आहे. त्यावर मी न बोललेले बरं…असं मोठं वक्तव्य खडसे यांनी केलं.
Discussion about this post