धुळे : मंत्री गिरीश महाजन यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नार्को टेस्टची खुली ऑफर दिली आहे. अनिल देशमुख यांनी समोरासमोर चर्चा करण्यास यावे. तसेच त्यांची आणि माझी नार्को टेस्ट करण्यात यावी; यानंतर समजेल कि कोण खरं बोलत आहे; असं ओपन चॅलेंज मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख याना दिले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमानिमित्ताने गिरीश महाजन धुळ्यात आले होते. कार्यक्रमणानंतर महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनिल देशमुखकांवर गंभीर आरोप केले. अनिल देशमुख हे यंत्रणेवर दबाव टाकून आमच्यावर खोटे गुन्हा दाखल करायला लावत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे.
वारंवार चुकीचे आरोप करून देशमुख हे स्वतःचा बचाव करत असल्याचा आरोपी त्यांनी केलेला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी देशमुखांविरोधात जबाब दिलेले असतानाही देशमुख खोटे दावे करत असल्याचा गिरीश महाजन यांनी सांगत, समोरासमोर चर्चेचं आणि नार्को टेस्टच आव्हान अनिल देशमुख यांना दिलं आहे. आता अनिल देशमुख गिरीश महाजन यांचे हे आव्हान स्वीकारतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत महाजन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. महाजन म्हणाले, कि नाथाभाऊंची दुटप्पी भूमिका असून त्यांना सर्व पक्ष व सर्व पद आपल्याच घरात पाहिजेत. तसेच एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्ष प्रवेशावरून देखील निशाणा साधत एकनाथ खडसे यांनी त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाला असेल तर तसे फोटो त्यांनी दाखवावे किंवा वरिष्ठांना आम्हाला आदेशीत करण्यास सांगावे, असे म्हणत एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत सांगण्यात आलेल्या पक्षप्रवेशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.















Discussion about this post