नवी दिल्ली । राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अखेर सर्वोच न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. मनी लॉनड्रिंगच्या गुन्हयात ईडीने अटक केली होती. गेली दोन वर्ष ते जेल मध्ये आहेत.
काय आहे प्रकरण ?
एकनाथराव खडसे हे महसूलमंत्री असतांना २०१६ साली भोसरी औद्योगीक वसाहतीतील एक भूखंड त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी आणि सौभाग्यवती मंदाताई खडसे यांनी विकत घेतला होता. या प्रकरणी खडसे यांनी गैरमार्गाने हा व्यवहार सुरळीत करण्यासाठी मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा आरोप झाला होता.
यातून त्यांना जून २०१६ मध्ये मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर याच प्रकरणात सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासामध्येच खडसेंचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांना ईडीने ७ जुलै २०२१ रोजी अटक केली असून ते आजवर कारागृहात आहेत.
यातच त्यांनी सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन दिला आहे.
Discussion about this post