जळगाव । धुळे शहरातील अट्टल घरफोड्या साहील प्रवीण झाल्टे उर्फ साहील शेख खलील शेख (20, रा.पश्चिम हुडको, चाळीसगांव रोड, पवन नगर धुळे) याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. त्याच्याकडील 12 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 159.92 ग्रॅम सोने व 450 ग्रॅम चांदीच्या दागिन्याने जप्त करण्यात आले आहे
याबाबत असे की, पराग जगन्नाथ चौधरी यांच्या बंद घरातून 22 तोळे सोने व 450 ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम 16 हजार 500 असा ऐवज गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात लांबवल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. फुटेजच्या आधारे भुसावळ टोलनाका व पारोळा टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पारोळा टोल नाक्यावर संशयीत दिसून आाल.
आरोपीबाबत पारोळा, अमळनेर, धुळे या परिसरात माहितगार इसमांकडे विचारपूस केली असता त्याचे नाव साहिल प्रवीण झाल्टे व तो धुळ्यातील कुविख्यात गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करुन रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.
अटकेतील आरोपीविरुद्ध वडनेर खाकुर्डी, पो.स्टे. तालुका मालेगांव आणि चाळीसगांव रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपीने गुन्ह्यात साथीदार पवनराज संजय चौधरी (रा.हत्ती गल्ली, पारोळा), सागर वाल्मीक चौधरी (रा. आझाद चौक, पारोळा), केशव बाळु सोनार (रा.शाहु नगर, अमळनेर) असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जळगांव यांच्या आदेशाने चोरीचा हस्तगत मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात आला.
Discussion about this post