चोपडा । तालुक्यातील आदिवासी भागात गेरुघाटी ते वैजापूर रस्त्यावरील वन विभागाच्या नाक्याजवळ पुन्हा एकदा गावठी कट्टा सापडल्याची घटना घडली असून आरोपीच्या ताब्यातून गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस व मोटारसायकल मिळून एकूण ७६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेहमल जेमल पावरा (वय २२) रा. जिरायत पाडा, ता. चोपडा हा वैजापूर रोड फरिस्ट नाक्या जवळ (चेकपोस्ट) आला. सार्वजनिक जागी त्याच्याकडे २५ हजार किमतीचा एक गावठी बनावट कट्टा व एक हजार रुपये किमतीचे पिवळ्या धातूचे एक जिवंत काडतूस (राउंड) उजवे खिशात मिळून आले.
गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस हे प्राणघातक अग्नि शस्त्र अरसल्याचे माहीत असतानाही विनापरवाना आपले कब्जात स्वतःच्या फायद्यासाठी जवळ बाळगून मोटारसायकलसह मिळून आला म्हणून रेशमल जेमल पावरा याच्याविरुद्ध पोलिस कॉन्स्टेबल चेलन महाजन यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल शशिकांत पारधी करत आहे.
Discussion about this post