जळगाव । पारोळा शहराच्या बायपासवर एक धक्कादायक घटना घडली. ज्यामुळे परिसरात घबराट पसरली. धुळ्याकडून जळगावकडे जाणारे एक टँकर वेगाने जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने हायवेच्या बाजूला जाऊन उलटले. या अपघातात टँकरमधून गॅसची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या अपघाताची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्तांना रूग्णालयात दाखल केले. पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आणि अनेक जण आपापल्या घरातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी गेले.
आज सकाळी पोलीस ठाण मांडून बसले असून, अग्नीशामक दलाचा बंब आणि रूग्णवाहिका देखील बोलावण्यात आलेली आहे. पोलिसांच्या प्रयत्नांमुळे हायवेवरील वाहतूक सुरळीत झाली आहे, परंतु या अपघातात नेमके किती जण जखमी झाले याची माहिती अद्याप समोर आली नाही.
Discussion about this post