मुंबई । बजेट 2025 सादर होण्याच्या काही तास आधी देशातील कोट्यवधी लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील सर्वसामान्य जनतेला गॅस सिलेंडरच्या दरात थोडा दिलासा मिळाला आहे.
तेल विपणन कंपन्यांनी १ फेब्रुवारी २०२५ रोजी १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. सिलेंडरची किंमत ७ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आज पासून १८०४ रुपयांवरून १७९७ रुपयांवर आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
तेल विपणन कंपनीने १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. आज, १ फेब्रुवारी पासून नवीन दर लागू होणार आहेत. दिल्लीत दर १७९७ रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. तर कोलकातामध्ये १९११ रुपयांवरून १९०७ रुपयांवर किंमत कमी झाली आहे. मुंबईत १७५६ रुपयांऐवजी १७४९.५० रुपयांना गॅस उपलब्ध होईल आणि चेन्नईमध्ये ही किंमत १९६६ रुपयांवरून १९५९.५० रुपयांवर आली आहे.
Discussion about this post