नवी दिल्ली । महिन्याच्या पहिल्याच तारखेला सर्वसामान्यांना महागाईचा धक्का बसला आहे. तेल विपणन कंपन्यांकडून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. आजपासून गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, दिलासादायक बाब ही आहे की १४ किलोग्रॅमच्या घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एलपीजी सिलेंडरचे नवे दर खालीलप्रमाणे आहेत.
दसऱ्याच्या आदल्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १५.५० रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून नवीन दर लागू करण्यात आले. राजधानी दिल्लीमध्ये १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १५९५.५० रूपये इतकी झाली आहे. आर्थिक वर्षात पहिल्यांदाच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. याधी लागोपाठ सहा महिने गॅस सिलिंडरचे दर सहा महिने स्वस्त झाले होते.
चालू आर्थिक वर्षामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात पहिल्यांदाच वाढ झाली आहे. सहा महिन्यापासून व्यावसायिक दरात कपात झाली होती. आजपासून नवे दर लागू झाले आहेत. मुंबईमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत १५४७ रूपये इतकी झाली आहे. कोलकात्यामध्ये १७००.५० रूपये, चेन्नईमध्ये १७५४.५० रूपये तर राजधानी दिल्लीमध्ये १५८० रूपये इतकी किंमत झाली आहे. १९ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचा वापर हॉटेल अन् रेस्टोरेंट्समध्ये होतो. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे खाण्या-पिण्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे.















Discussion about this post