मुंबई । आजपासून नवीन वर्षाची (२०२६) सुरुवात होतेय. तर १ जानेवारी रोजी देशात अनेक मोठ्या बदलांची सुरुवात होणार आहे. या बदलांचा परिणाम प्रत्येक घरात आणि प्रत्येक व्यक्तीच्या खिशावर होत असतो. दरम्यान आज गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १११ रूपायंची वाढ झाली आहे. हे दर 1 जानेवारी 2026 पासून लागू होतील.दिलासादायक म्हणजे, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, दर जैसे थे आहेत.
मुंबई, दिल्ली आणि कोलकाता, हैद्राबाद यासारख्या प्रमुख शहरांसह देशभरात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली. तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या 1 किलो आकाराच्या सिलेंडरच्या किंमती वाढवल्या आहेत, ज्यामुळे प्रति सिलिंडर 111 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर ज्याची किंमत पूर्वी 1580.50 रूपये होती, त्याची किंमत आता 1691.50 झाली आहे.
मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत पूर्वी 1531.50 होती, ती आता वाढून 1642.50 झाली आहे. चेन्नईमध्ये किंमत 1739.5 वरून 1849.50 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर रोजीही व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे ते सर्व शहरांमध्ये स्वस्त झाले होते. मात्र, आता परत सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
नवीन वर्षात महागाई कमी होण्याची लोकांना अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात उलटेच घडले. महागाई कमी होण्यापेक्षा वाढताना दिसत आहेत. त्यामध्येच वर्षाच्या पहिल्याच दिवशी अशाप्रकारचा मोठा झटका तेल कंपन्यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिला आहे.















Discussion about this post