मुंबई । जून महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी केले आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत २४ रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र घरगुती एलपीजी घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.आज १ जूनपासून नवीन दर लागू होणार आहेत.
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग तिसऱ्या महिन्यात घसरण झाली आहे.गेल्या तीन महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रति गॅस सिलिंडर 80 रुपयांपेक्षा जास्त कपात आहे.
आज व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत २४ रुपयांनी स्वस्त झाली. यानंतर आता १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १७२३.५० रुपयावर आला. एप्रिलमध्ये, व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १,७६२ रूपयांपर्यंत कमी करण्यात आली. फेब्रुवारीमध्येही किंमती ७ रूपयांनी कमी करण्यात आल्या होत्या, परंतु मार्चमध्ये पुन्हा ६ रूपये वाढवण्यात आले. नवीन किंमत रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि इतरांसह लहान व्यवसायांसाठी दिलासादायक आहे. .
Discussion about this post