मुंबई । दिवाळीच्या दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे, सलग चौथ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये आजपासून पुन्हा वाढ केली आहे. १९ किलो वजनाच्या व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये ६२ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. IOCL च्या संकेतस्थळानुसार, आजपासून ही वाढ लागू असेल.
दरम्यान, मार्चपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत अखेरीस १०० रुपयांनी कपात करण्यात आली होती. पण मागील चार महिन्यापासून व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ होत आहे.
LPG सिलेंडर महागला, बजेट कोलमडणार –
आज नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस.. व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये ६२ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किंमती ठरवल्या जातात. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून १९ किलो वजनाच्या व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये ६२ रुपयांनी वाढ केली आहे. मुंबईमध्ये आता १९ किलो वजनाचा व्यवसायिक गॅस सिलेंडर 1754 रुपयांना मिळेल. तर दिल्लीमध्ये 1802, कोलकात्यामध्ये 1911.50 आणि चेन्नईमध्ये 1964 रुपयांना व्यवसायिक गॅस सिलेंडर मिळणार आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत.