नवी दिल्ली । नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आज 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 30.50 रुपयांची कपात करण्यात आली.
गॅस सिलिंडरच्या दरात किती बदल?
IOCL नुसार, दिल्लीत 19 किलो LPG सिलेंडरची किंमत आजपासून 1764.50 रुपये झाली आहे. मार्च महिन्यात व्यावसायिक एलपीडी गॅस सिलेंडरची किंमत 1795 रुपये होती. याशिवाय गॅस सिलेडरच्या किंमत कपातीनंतर आता कोलकात्यात सिलेंडर 1879 रुपये आहे. पूर्वी ही किंमत 1911 रुपये होती. गॅस सिलेंडर स्वस्तर झाल्यानंतर मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1717.50 रुपये झाली आहे, जी किंमत आधी1749 रुपये होती. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेडर आता 1930 रुपयांना मिळणार आहे.
गॅस सिलेंडर कुठे, किती रुपयांनी स्वस्त?
दिल्लीत एलपीजी सिलेंडरचे दर 30.50 रुपयांनी कमी झाले आहेत.
कोलकात्यात गॅस सिलेंडरच्या किमती 32 रुपयांनी कमी झाल्या
मुंबईत गॅस सिलेंडरचे दर 31.50 रुपयांनी कमी झाले आहेत.
चेन्नईमध्ये सिलेंडरच्या किमती 30.50 रुपयांनी कमी झाल्या आहेत.
घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर काय?
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. घरगुती एलपीजी सिलेंडर म्हणजे 14.2 किलो गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.
Discussion about this post