मुंबई । ऑगस्टच्या पहिल्या तारखेला देशातील सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत.यावेळी तेल कंपन्यांनी केवळ व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलतात. गेल्या महिन्यात व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत बदल झाला होता.
एलपीजी किती रुपयांनी स्वस्त झाला?
1 ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी कपात केली आहे. या कपातीनंतर देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत 1680 रुपयांवर गेली आहे. यापूर्वी, 4 जुलै 2023 रोजी व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत किरकोळ रूपयांची वाढ करण्यात आली होती.
गेल्या महिन्यात भाव वाढले होते
मागील महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजे 1 जुलै 2023 रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, म्हणजेच घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलिंडरच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या होत्या. मात्र तीन दिवसांनंतर 4 जुलै 2023 रोजी तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात सात रुपयांची वाढ केली होती.
प्रमुख शहरांमध्ये किमती कमी केल्या
कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये १९ किलोच्या स्वयंपाकाच्या व्यासायिक गॅस सिलेंडरची किरकोळ किंमत आजपासून अनुक्रमे १८०२.५० रुपये, १६४०.५० रुपये आणि १८५२.५० रुपये आहे, एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले. १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरचे दर अखेरीस ४ जुलै रोजी सुधारित करण्यात आले होते.