मुंबई : सर्वसामान्य जनतेला झटका देणारी एक बातमी आहे. इंडियन ऑइल (Oil) कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली. दरात 7 रुपयांनी वाढ केली आहे.
ऑइल कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर जाहीर केले जातात. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅसचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. त्यात कोणताही बदल करण्यात आला नव्हता.
मात्र यावेळी तेल कंपन्यांनी ४ जुलै रोजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.गॅस सिलिंडरच्या किमतीत 7 रुपयाची वाढ करण्यात आल्याने आता १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंhडरवर १,७७३ रुपयांऐवजी १,७८० रुपये मोजावे लागणार आहे.
गेल्या चार महिन्यांपासून तेल कंपन्यांकडून सातत्याने कपात केली जात होती. 1 मार्च 2023 रोजी सिलिंडरची किंमत 2119.50 रुपये होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ते 2028 रुपये, मे मध्ये 1856.50 रुपये आणि 1 जून रोजी 1773 रुपये झाले. आता चार महिन्यांनंतर सिलिंडरची किंमत सात
Discussion about this post