मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मैदानात उतरलेत. दोन्ही आघाड्यांकडून अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आले नसले कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जोरदार इनकमिंग सुरु झाले आहे. अशातच नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते शरद पवार गटाच्या वाटेवर आहे.
नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते तुतारी घेण्याची शक्यता असून ते आज मुंबईत शरद पवारांची भेट घेणार असल्याचं समजत आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातून गणेश गीते निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. नाशिक पूर्व मध्ये राहुल ढिकले आहेत भाजपचे सध्या विद्यमान आमदार आहे. भाजपाकडून उमेदवारी मिळत नसल्याने गणेश गीते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.















Discussion about this post