नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. गॅस ऑथेरिटी ऑफ इंडिया म्हणजे गेलने (GAIL) विविध पदांच्या ३९१ जागांसाठी भरती काढली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
या पदांसाठी होणार भरती?
यात ज्यूनिअर इंजिनीअर, फोरमन, ज्युनिअर केमिस्ट, ज्युनिअर सुप्रिटेंडन्ट, ज्युनिअर अकाऊंटन्ट, टेकनिकल असिस्टंट, अकाऊंट असिस्टंट, बिझनेस असिस्टंट, ऑपरेटर (केमीकल) आणि टेक्निशियन अशा पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात.
GAIL मधील ही भरतीच्या प्रक्रिया ८ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ७ सप्टेंबरपर्यंत आहे. तुम्हाला यादिवशी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. ३९१ पैकी २२ जागा या PwBDs साठी म्हणजे शारीरिक व्यंग असलेल्या उमेदवारांसाठी राखीव असणार आहे. GAIL ने यासंदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
ऑनलाईन अर्ज कसा कराल?
-सर्वात आधी तुम्हाला GAIL च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
-https://www.gailonline.com/CRApplyingGail.html या वेबसाईटवर तुम्ही क्लिक करू शकता
-होमपेजवर गेल्यानंतर ‘Career Opportunities in various disciplines for non-executives’ वर क्लिक करा
– यावर ‘Application Form’ वर क्लिक करा
– अर्ज भरण्याआधी सर्व सूचना व्यवस्थित वाचून घ्या
-त्यानंतर ‘To Register’ लिंकवर क्लिक करा
– सर्व माहिती पुन्हा एकदा चेक करा
-त्यानंतर अर्ज सबमिट करा, तुम्ही अर्जाची प्रिंट देखील काढू शकता.
किती असेल पगार?
ज्युनिअर इंजिनिअरसाठी डिप्लोमा आवश्यक आहे, यात तुमची पे स्केल ३५ हजार ते १,२८,००० इतकी असेल
फोरमनसाठी (इलेक्ट्रिकल) डिप्लोमा आवश्यक आहे, यात तुमची पे स्केल २९ हजार ते १ लाख २० हजार असेल
ज्युनिअर सुप्रिटेंडन्ससाठी पदवी असणे आवश्यक असेल. यात तुमचा पे स्केल २९ हजार ते १ लाख २० हजार असेल
ज्युनिअर केमिस्टसाठी मास्टर डिग्री (M.Sc.) आवश्यक आहे. तुम्हाला यात २९ हजार ते १ लाख २० हजार पे स्केल मिळेल
ज्युनिअर अकाऊंटन्टसाठी कॉमर्समध्ये मास्टर डिग्री किंवा सीए/ICWA झालेलं असणं आवश्यक आहे. यात तुम्हाला २९ हजार ते १ लाख २० हजार पे स्केल मिळेल
Discussion about this post