भुसावळ । ऐन सणासुदीच्या तोंडावर रेल्वकडून तांत्रिक कारणांमुळे रेल्वे गाड्या रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांची हिरमोड होत आहे. अशातच आता प्रयागराज स्टेशनवर प्लॅटफॉर्मचे काम सुरू आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही गाड्या खालीलप्रमाणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात ०१०२५ दादर-बलिया स्पेशल ही २९ डिसेंबर २०२३ पर्यंत रद्द आहे. ०१०२६ बलिया-दादर स्पेशल ही ता.१८ ते ३१ डिसेंबरपर्यंत रद्द आहे.
०१०२७ दादर-गोरखपूर स्पेशल ३० डिसेंबरपर्यंत रद्द आहे. ०१०२८ गोरखपूर- दादर स्पेशल ही उद्यापासून (ता.१९ आक्टोबर) सुरु होणारी १ जानेवारी २०२४ पर्यंत रद्द आहे. संबंधितांनी नोंद घ्यावी. प्रवाशांच्या या गैरसोयीबाबत रेल्वे प्रशासनाला सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे















Discussion about this post