यावल । तालुक्यात दोन दिवसात चार जणांनी आत्महत्या केली, त्यात चिंचोली येथील ३५ वर्षीय तरूणाने सोमवारी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली, रविवारी सावखेडासिम येथील बेपत्ता ४१ वर्षीय इसमाचा मृतदेह विहिरीत आढळला. शिवाय वढोदा येथील १८ वर्षीय तरूणीने विहिरीतच उडी घेतल्याचे समोर आले आहे. तर अकलुदच्या १५ वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.
चिंचोली येथील रहिवासी समाधान बळीराम कोळी (वय ३५) या तरूणाने सोमवारी चिंचोली गावाजवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, हा प्रकार निर्देशनास आल्यावर तातडीने त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात आणले तेथे डॉ प्रशांत जावळे यांनी तपासणी करत त्याला मृत घोषीत केले. या प्रकरणी यावल पोलिसांत संदीप कोळी यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास हवालदार वासुदेव मराठे, नरेंद्र बागुले करीत आहे.
दुसरी घटना सावखेडासिम येथील असून अनिल प्रकाश पाटील (वय ४१) हे दि.२ जूनपासून बेपत्ता होते, पोलिसात ते हरवल्याची नोंद केली होती. दरम्यान रविवारी त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. याप्रकरणी यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली, तसरी घटना वढोद्याची असून तेथील जयश्री सपकाळे (वय १८) या तरुणीने वढोदा शिवारातीलच विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. तिला यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता तिला मृत
घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद केली. तपास हवालदार किरण आणोणे करीत आहे.
चौथी घटना अकलूदची असून तेथील दिव्या विनोद कोळी (वय १५) या मुलीने राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली.















Discussion about this post