जळगाव । जळगाव जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून याच दरम्यान यावल तालुक्यात घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आलीय. सुदैवाने या घटनेतून ८ वर्षांचा चिमुकला थोडक्यात बचावला आहे.
यावल तालुक्यातील आंबा पाणी गावाजवळील थोर पाणी परिसरात ही घटना काल रविवारी घडली आहे. रविवारी जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. वाऱ्याचा जोर अधिक असल्याने थोर पाणी येथे नानसिंग गुला पावरा यांचे अचानक घर कोसळलं.
त्यामुळे नानसिंग, त्यांची पत्नी आणि तीन मुले असे एकूण पाच जण ढिगार्याखाली अडकले. त्यांना श्वास घेण्यासाठी अडचणी आल्या. यामुळे गुदमरून नानसिंग गुला पावरा ( वय २८ ); त्यांची पत्नी सोनूबाई नानसिंग पावरा ( वय २२) तसेच रतीलाल हा तीन वर्षाचा मुलगा तर बालीबाई यांचा मृत्यू झाला
नशीब बलवंत्तर असल्याने या घटनेत ८ वर्षांच्या चिमुकल्याचे प्राण वाचले. मात्र, या घटनेत अख्खं कुटुंबच संपलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिकांकडून माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहेत.















Discussion about this post