जळगाव : जुने भांडणातून युवकाला मारहाण करीत विष पाजून त्याचा खून केल्याची घटना जळगावात उघडकीस आली. चेतन प्रकाश चौधरी (23, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असं मृत तरुणाचं नाव असून याप्रकरणी अखेर चौघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात
रविवारी दुपारी चार वाजता चेतनला गल्लीतील चार तरुणांनी जुन्या वादातून चेतनला बेदम मारहाण केल्याने तो गल्लीत पडल्याची माहिती त्याच्या वडिलांना कळताच त्यांनी धाव घेत मुलाला जिल्हा रुग्णालयात हलवले मात्र रात्री साडेआठ वाजता त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी प्रकाश रघुनाथ चौधरी (62, प्रियंका किराणा शेजारी, रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांनी जळगाव एमआयडीसी पोलिसात मंगळवारी रात्री तक्रार दिल्यानंतर संशयित सचिन कैलास चव्हाण, सोन्या उर्फ तुषार जाधव, सनी जाधव उर्फ फौजी व कुंदन पाटील यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक जगदाडे, उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील, पंकज पाटील, छगन तायडे, ईश्वर भालेराव, चंद्रकांत पाटील, ललित नारखेडे, चालक ईम्तियाज खान आदींनी कारवाई केली.
Discussion about this post