पुणे शहरातील हिट अँड रन केस प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून अशातच उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.टोयोटा फॉर्च्युनरने एका वृद्ध व्यक्तीला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार या व्हिडिओमध्ये दिसत आहे.या अपघाताच्या घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील झाशीच्या सिपरी बाजार भागात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झाशीतील एका अरुंद रस्त्यावर टोयोटा फॉर्च्युनरने वाहनाच्या मागे जात असलेल्या ७० वर्षीय वृद्धाला चिरडले. या हृदयद्रावक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. झाशीच्या सिपरी बाजार भागात ही घटना घडली. फॉर्च्युनरला एका अरुंद गल्लीतून जायचे होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या उभ्या होत्या. चालक गाडी पाठीमागे घेत होता. त्याचवेळी पाठीमागे उभ्या असलेला वृद्ध त्या खाली चिरडला गेला.
https://twitter.com/Benarasiyaa/status/1793870968785682596
धक्कादायक बाब म्हणजे वृद्ध व्यक्ती गाडीखाली चिरल्यानंतर ओरडत होता, विव्हळत होता मात्र ड्रायव्हरला त्याची कल्पनाच नव्हती. फॉर्च्युनर चालकाने एकदा नव्हेतर दोनदा त्याच्या अंगावर गाडी घातली. गाडी मागे घेतल्यानंतर वृद्ध व्यक्ती उठण्याचा प्रयत्न करत असतानाच पुन्हा कार चालकाने त्याला चिरडले.
या दुर्घटनेत राजेंद्र गुप्ता ही व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी गाडीच्या चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्याने मुद्दाम वृद्ध व्यक्तीला गाडीखाली चिरडल्याचे आरोप केले आहेत.
Discussion about this post