जळगाव । जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ममुराबाद रोडवरील एल के. फॉर्म सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक म्हणजे हा फॉर्म हाऊस जळगावचे माजी महापौरांचा असून या कारवाईत कॉल सेंटरचा मालकासह एकूण आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, परदेशी नागरिकांना वेगवेगळ्या आमिषांनी फसवण्याचा हा ‘हायटेक’ गोरखधंदा उघडकीस आला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी लोकांना संपर्क साधून, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची ऑनलाइन फसवणूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जळगावातील ममुराबाद रोडवर असलेल्या माजी महापौर ललित कोल्हे यांच्या या फॉर्म हाऊसमध्ये हे बनावट कॉल सेंटर सुरू होतं. या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आहे.
या छाप्यात पोलिसांनी सध्या उपस्थित असलेल्या आठ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच, फॉर्मचे मालक ललित कोल्हे यांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितले की, या कॉल सेंटरमध्ये एकूण २० ते २५ जण काम करत होते. अटक झालेले बहुतांश आरोपी हे राज्याबाहेरील रहिवासी असल्याचेही निष्पन्न झाले आहे, ज्यामुळे या टोळीचा आंतरराज्यीय स्तरावर फैलाव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.















Discussion about this post