आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. खरं तर, गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) शनिवारी तेलगू देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर काही वेळातच सीआयडीने त्यांना अटक केली. पहाटे 3 वाजता सीआयडीची टीमने आरके फंक्शन येथील कँम्पमधून चंद्राबाबूंना अटक केली. त्यांना नांदयाल रेंजचे डीआयजी रघुरामी रेड्डी आणि सीआयडीच्या टीमने अटक केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नेमकं प्रकरण काय?
वायएसआर काँग्रेसचे नेते आणि मंत्र्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर आरोप केला होता. चंद्राबाबूंनी 118 कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला होता. त्याशिवाय चंद्राबाबूंवर 350 कोटींच्या घोटाळ्याचा आरोपही आहे. हे सर्व प्रकरण पाहता आपल्याला अटक होईल असं चंद्राबाबू यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. त्यानंतर आज त्यांना अटक झाली.
मुलालाही अटक
चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव आणि टीडीपीचे नेते नारा लोकेश यांना पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. टीडीपीच्या सोशल मीडियाने याबाबतची माहिती दिली आहे. लोकेश यांचा व्हिडीओही जारी करण्यात आला आहे. लोकेश चंद्राबाबू यांना भेटू शकत नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
Discussion about this post