धरणगाव । धरणगाव शहरात महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर तीन ते चार वेळेस अत्याचार केला. याबाबत संशयित आरोपीविरोधात धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील एका भागात राहणाऱ्या विवाहितेचा परिसरातच राहणाऱ्या एका तरुणाने अंघोळ करतानाचा व्हिडीओ तयार केला होता. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तसेच पिडीतेच्या मुलाला उचलुन नेण्याची व नवऱ्या मारुन टाकण्याची धमकी देत तिच्यावर जून २०२३ ते १६ डिसेंबर या काळात ३ ते ४ वेळा बळजबरीने वेळोवेळी शाररिक संभोग केला. याप्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून बलात्कारासह विविध कलमान्वये धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उप. निरिक्षक संतोष पवार हे करीत आहेत.
Discussion about this post