पुणे : हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ होण्याच्या अनेक घटना समोर येत असून यात अनेक मुलींना त्यांचं आयुष्य देखील गमवावं लागतं. यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहितेला हुंड्यासाठी दोन्ही हात बांधून शेततळ्यात बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यात घडली. सुरेखा भाऊसाहेब गडदरे अस मयत महिलेचे नाव असून याबाबत मासाळवाडी येथील चौघाविरुद्ध पोलिसांनी खुनाचा व हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पती, सासू, नणंद व नंणदेचा पती या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा मिळाला नसल्यानं सासरचे लोक सुरेखाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते, असा आरोप आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी याप्रकरणी पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासु ठकुबाई महादेव गडदरे नणंद आशा कोकरे व तिचा पती सोनबा कोकरे या चौघां विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील गिरिम येथील नामदेव बबन करगळ यांनी पोलिसांकडे फिर्याद दिल .
24 डिसेंबर रोजी मासाळवाडीच्या भगवान गडदरे यांच्या शेतातील शेततळ्यात त्यांची विवाहित मुलगी सुरेखा भाऊसाहेब गडदरे हिचा मृतदेह आढळून आला. वरील चौघा आरोपींनी तिच्या घराशेजारी असलेल्या शेततळ्यामध्ये सुरेखा हिचे दोन्ही हात बांधून तिला शेततळ्यात बुडवून मारले अशी फिर्याद तिचे वडील करगळ यांनी पोलिसांकडे दिली त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.इतक्या क्रूरपणे हुंड्यासाठी सुनेला मारणाऱ्या निर्दयी आरोपींना कडक शिक्षा करावी, अशी मृत मुलीच्या कुटुंबाची मागणी आहे.
Discussion about this post