आज सकाळी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात घडलीय. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजून काही लोक दबले गेले असण्याची शक्यता आहे. तसेच अनेक जण जखमी झाल्याची बातमी आहे. फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर बचावकार्य सुरू आहे. स्फोटात कारखान्याची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखान्यात रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. स्फोटामुळे कारखान्याची संपूर्ण इमारत कोसळली. त्याचवेळी आगीमुळे मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाले होते. कोलकातापासून 30 किमी अंतरावर नीलगंजमधील मोशपोल येथे हा अपघात झाला. ज्यावेळी कारखान्यात स्फोट झाला त्यावेळी तेथे बरेच लोक काम करत होते. अग्निशमन केंद्र अधिकारी असिस घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तपुकुरमधील बेकायदेशीर फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर ५ मृतदेह बाहेर काढण्यात आले.
#WATCH | West Bengal: Several people feared dead in an explosion at the Illegal crackers factory in Duttapukur. A rescue operation is underway. The injured are being taken to Barasat Hospital for treatment: Duttapukur Police sources pic.twitter.com/YzKW7cU8gM
— ANI (@ANI) August 27, 2023
बंगालमध्ये यापूर्वीही अशी घटना घडली आहे.
मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या फटाक्यांच्या कारखान्याची माहिती गोळा करण्यात येत आहे. या फटाका कारखान्याचा परवाना होता की नाही? यासोबतच फटाका कारखान्याला लागलेल्या आगीमागील कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. याबाबत अधिक माहिती संकलित करण्यात येत आहे. यासोबतच घटनेच्या वेळी कारखान्यात किती लोक उपस्थित होते. या सर्व बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात आग लागण्याची आणि त्यानंतर स्फोट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एग्रा येथे एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला होता. ज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला.
Discussion about this post