मुंबई । आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले असून मतदारासंघांसह जागावाटपाची चाचपणीही केली जातेय. अशातच वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत घेत ही घोषणा केली. पहिल्या यादीत ११ जणांची घोषणा करण्यात आली. यात रावेर, नागपूर दक्षिण मध्य, वाशिम, शिंदखेड राजा, शेवगाव, नांदेड दक्षिण या जागांचा समावेश आहे.
विशेष वंचितने रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवाराला रिंगणात उतरवलंय. शमिभा पाटील असे वंचितच्या रावेर मतदारसंघातून लढणाऱ्या उमेदवाराचे नाव आहे. शमिभा भानुदास पाटील या एक मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक संस्थापक आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे पहिले उमेदवार
रावेर – शमिभा पाटील
शिंदखेड राजा – सविता मुंढे
वाशिम – मेघा किरण डोंगरे
धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा
नागपूर दक्षिण मध्य – विनय भागणे
साकोली – डॉ. अविनाश नान्हे
नांदेड दक्षिण- फारुख अहमद
लोहा – शिवा नारांगले
औरंगाबाद पूर्व- विकास रावसाहेब दांडगे
शेवगाव – किसन चव्हाण
खानापूर – संग्राम कृष्णा माने















Discussion about this post