भुसावळ । दिवाळी आणि छठ सणांसाठी रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्ष्य घेता भारतीय रेल्वेने १३ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी दरम्यान १२ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या सणांच्या काळात, विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर प्रदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या घरी सहज पोहोचण्यास मदत करतील.
ट्रेन क्रमांक ०४२२६ वाराणसी जंक्शन – लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल १३ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान धावेल. ही ट्रेन वाराणसीहून पहाटे १:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) येथे दुपारी २:२५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०४२२५ लोकमान्य टिळक टर्मिनस – वाराणसी स्पेशल १४ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान धावेल. ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनसहून दुपारी ४:५५ वाजता सुटेल, आणि वाराणसीला तिसऱ्या दिवशी पहाटे २:०५ वाजता पोहोचेल.
दोन्ही दिशांना, ही ट्रेन जौनपूर शहर, सुलतानपूर, कानपूर सेंट्रल, ओराई, वीरंगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे स्थानकांवर थांबेल. या ट्रेनमध्ये एकूण १६ कोच असतील, ज्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या एसी कोचचा समावेश असेल.















Discussion about this post