पाचोरा । पाचोरा शहरात कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला असून यात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला आहे. तर त्याच्यासोबत असलेला मित्राचे दोन्ही पाय फॅक्चर झाले. पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, जळगाव चौफुली जवळील श्रीकृष्ण नगर परीसरातील रहिवासी असलेले भुषण संतोष हटकर (वय – २०) व प्रविण नाना हटकर (वय – २२) हे दोघे मित्र दुचाकी क्रमांक (एमएच १९ ई डी २१९६) वरुन मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घरी जात होते. दरम्यान जारगाव चौफुलीकडून (एमएच १५ – बीएन १०३५) मधील दोघेजण भडगाव रोडकडे जात असतांना दोन्ही वाहने एकमेकांवर आदळले. यात दुचाकीस्वार भुषण संतोष हटकर हा जागेवर ठार झाला तर त्याचे मागे बसलेला प्रविण नाना हटकर याचे दोन्ही पाय फॅक्चर झाले.
व चारचाकी वाहनातील देशमुखवाडी परीसरातील दोघ इसम गंभीर जखमी झाले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर जखमी प्रविण नाना हटकर हा आईवडीलास एकुलता एक मुलगा असून तो बाजार समितीत हमाली काम करतो. मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. या अपघात प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















Discussion about this post