लखनौ । उत्तरप्रदेशात एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एका स्लीपर डबल डेकर बस आणि दुधाच्या टँकरमध्ये आज पहाटे भीषण अपघात झाला. यात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनौ-आग्रा महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात घडला. बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जाणाऱ्या एका डबल डेकर बसने दुधाच्या टँकरला भीषण धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात बस आणि कंटेनरचाही अक्षरश: चुराडा झाला. उन्नावमधील बेहता मुजावर पोलीस स्टेशन हद्दीतील गधा गावासमोर हा अपघात घडला.
या अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. तर 20 पेक्षा जास्त प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर वेगाने बचावकार्य सुरु करण्यात आले. या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने जवळच्या बांगरमौ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच पोलिसांकडून हा अपघात कसा घडला, याचा संपूर्ण तपास सुरु आहे.















Discussion about this post