मुंबई । आज नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून अनेक महत्वाचे बदल झाले आहे. यात फास्टॅगबाबतही एक महत्वपूर्ण बदल झाला आहे. आता प्रत्येक कारला मोठ्या वाहनांना फास्टॅग लावणे बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील (एमएसआरडीसी) सर्व टोल नाक्यांवर 1 एप्रिलपासून फास्टॅगद्वारेच टोल वसूल करण्यात येणार आहे. जर तुमच्या वाहनाला फास्टॅग नसेल तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.
जर तुम्ही यूपीआय, रोक रक्कम किंवा कार्डद्वारे टोल भरणार असेल तर तुम्हाला डबल टोल भरावा लागणार आहे. यापूर्वी एमएसआरडीसीच्या टोल नाक्यांवर हायब्रीड पद्धतीने टोल वसुली केली जात होती. याद्वारे रोख रक्कम, स्मार्ट कार्ड, डेबिट कार्ड, पीओएस मशीन किंवा क्युआर कोडद्वारे टोल स्वीकारला जात होता. मात्र, आता पूर्णपणे फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. |
मंगळवारपासून या हायब्रीड मार्गिका बंद करुन सर्व मार्गिका फास्टॅग मार्गिकेत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयामुळे फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी फास्टॅग स्टीकर खरेदी करावेत, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, एमएसआरडीसीच्या 9 रस्ते प्रकल्पांतर्गत असलेल्या सर्व टोल नाक्यांवर हा निर्णय लागू होणार आहे. या निर्णयामुळे तुमचा वेळ वाचणार आहे आणि लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज लागणार नाही. FASTag Rule |
या टोल नाक्यांवर असेल फास्टॅग बंधनकारक
१. वांद्रे वरळी सागरी सेतू
२. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई पुणे जुना मार्ग
३. मुंबई प्रवेशाद्वारावरील 5 टोल नाके
४. समृद्धी महामार्गावरील २३ टोल नाके
५. नागपूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील पाच टोल नाके
६. सोलापूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील चार टोल नाके
७. संभाजीनगर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील तीन टोल नाके
८. काटोल बायपास
९. चिमूर वरोरा वणी
Discussion about this post