चाळीसगाव । गिरणा धरणातून पांझण डावा कालव्याव्दारे गुरांच्या चा- यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी आज (शनिवार) शेतक-यांनी नाशिक जिल्ह्यात आंदोलन छेडले. शेतक-यांनी मालेगाव चाळीसगाव महामार्ग रोखून धरला. यामुळे एक तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
मालेगाव तालुक्यातील कळवाडी, चिंचगव्हाण, उंबरदे, देवघट, साकुर, दापोरे, नरडाणे या गावांसह चाळीसगाव तालुक्यातील बहुतांश गावांत अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे. परिणामी या भागात दुष्काळी परिस्थीती निर्माण झालेली आहे.
गिरणा धरणात 57 टक्के इतका जलसाठा असुन साधारणतः १२००० ते १३००० क्यूसेक पाणी आहे. गिरणा धरणातुन नदीद्वारे जळगाव जिल्ह्याला ४ आवर्तन सोडण्यात येणार आहे. तरी धरणात जलसाठा पुरेसा असुन कळवाडीसह देवघट, दापुरे, साकुर, नरडाणे, चिंचगव्हाण, उंबरचे गावांसाठी पर्जन्य कमी झालेले असुन विहरींनी तळ गाठला असल्याने जनावरांसाठी चा-याचा प्रश्न बिकट झालेला आहे. पांझण डावा कालव्यात देखील पाणी तात्काळ सोडावे अशी मागणी करत महिला, लहान बालकांसह शेतकरी आंदोलनाला बसले आहेत.















Discussion about this post