जळगाव । कर्जबाजारीला कंटाळून ५५ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जळगाव तालुक्यातील धानवड इथे घडली. शिवाजी चिंधा पाटील असं मयत शेतकऱ्याचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धानवड येथे शिवाजी चिंधा पाटील हे पत्नी, दोन मुलं आणि नातवंडे यांच्यासह वास्तव्याला होते. मंगळवार १९ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता त्यांनी राहत्या घराच्या मागच्या खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.
“कर्जबाजारीला कंटाळून मी आत्महत्या करत आहे” असे सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून ते विवंचनेत असल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा असा अंदाज नातेवाईकांनी दिला आहे. दरम्यान सदर प्रकार त्यांचा मुलगा आणि पत्नीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रचंड आक्रोश केला. नातेवाईकांनी त्यांना खाली उतरून त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
Discussion about this post