संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा सर्व पिकांच्या किमान आधारभूत किंमतीसाठी (एमएसपी) कायदेशीर हमीसह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. सरकारवर दबाव आणण्यासाठी शेतकऱ्यांनी आज ‘रेल रोको’ आंदोलन पुकारलं आहे.
शेतकरी तब्बल ४ तास रेल रोको आंदोलन करणार आहेत. दरम्यान, किसान मजदूर मोर्चाचे नेते सर्वनसिंह पंढेर यांनी माध्यमांना सांगितलं की, आंदोलक शेतकरी फिरोजपूर, अमृतसर, रूपनगर, गुरुदासपूर जिल्ह्यांसह पंजाबमधील अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर बसणार आहे. आज दुपारी १२ ते ४ या वेळेत हे आंदोलन केलं जाणार आहे.
‘रेल रोको’मध्ये कोण कोण सहभागी होणार?
शेतकऱ्यांचा हा दिल्ली मोर्चा १३ फेब्रुवारीपासून सुरू झाला. सुरक्षा दलांनी दिल्लीकडे जाणारा त्यांचा मोर्चा रोखल्यानंतर आंदोलक शेतकरी पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकून आहेत. शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांनी शनिवारी केंद्राने सर्व पिकांवर एमएसपीसाठी कायदेशीर हमी देण्याच्या जबाबदारीपासून पळ काढू नये, असं आवाहन केलं आहे.
- शेतकरी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज रेल रोको आंदोलनाच्या तयारीत आहेत. भारती किसान युनियन (एकता उग्रहण), भारती किसान युनियन आणि क्रांतीकारी किसान युनियन, संयुक्त किसान मोर्चाचा भाग असलेल्या शेतकरी संघटना देखील ‘रेल रोको’ आंदोलनात सहभागी होणार आहेत.















Discussion about this post