मुंबई : केरळ नंतर अवघ्या तीन दिवसात मान्सून रविवारी महाराष्ट्रात दाखल झाला. त्यानंतर मान्सून लवकर संपूर्ण राज्य व्यापेल. राज्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यादरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व घरगुती सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करणे गरजेचे आहे. अन्यथा घरगुती बियाणे पेरणी योग्य नसल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व घरगुती सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासून घेतली नव्हती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. अशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून उगवण क्षमता तपासूनच पेरणी करणे गरजेचे आहे. घरगुती सोयाबीन बियाणाची 70 टक्क्यापेक्षा अधिक उगवण क्षमता असल्यास घरगुती बियाणे पेरणीसाठी योग्य आहे.
जर 70 टक्क्यांपेक्षा कमी उगवण क्षमता असल्यास प्रत्येकी एक टक्का कमी उगवण क्षमतेसाठी अर्धा किलो जास्तीचे घरगुती बियाणे वापरावे असे आवाहन कृषी विभागातर्फे शेतक-यांना करण्यात येत आहे.
Discussion about this post