यावल : यावल तालुक्यातील पिळोदे खुर्द येथे 53 वर्षीय शेतकरी आपल्या शेतामध्ये फवारणी करीत फवारणीचे औषध त्यांच्या नाका आणि तोंडातून शरीरात गेल्याने विषबाधा झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. सुरेश धोंडू पाटील (53) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
फवारणी करताना झाली विषबाधा
पिळोदे खुर्द, ता.यावल येथील सुरेश पाटील हे शेतकरी आपल्या शेतात रविवार, 10 सप्टेंबर रोजी फवारणी करीत असताना फवारणीचे औषध त्यांच्या नाकात तोंडातून अंगाद्वारे शरीरात गेले आणि अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ आणल्यानंतर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असतांना त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.















Discussion about this post