मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली. या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकार 4 हजार 849 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत करणार आहे, याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील 963 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या वर प्रतिक्रिया देताना बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. याशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा देखील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
दरम्यान, सध्याचं राज्यातील वातावरण पाहाता या बैठकीमध्ये काय निर्णय घेतले जाणार? या बैठकीला कोण कोण मंत्री उपस्थित असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं? या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची उपस्थिती नव्हती. मात्र दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडून मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील तपासाचा आढावा देखील घेण्यात आला आहे.
Discussion about this post