सिनेसृष्टीमध्ये खळबळ उडवून देणारी एक बातमी समोर आलीय. सुप्रसिद्ध तमिळ संगीतकार, अभिनेता आणि निर्माता विजय अँटोनी यांच्या मुलीने आज (१९ सप्टेंबर) पहाटे आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या मुलीने आपल्या चेन्नईतील राहत्या घरी गळफास घेतला आहे. पहाटे ३ वाजता विजय यांची मुलगी घरामध्ये मृतावस्थेत आढळली. लगेचच तिला कुटुंबीयांकडून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचाराआधीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. विजयची मुलगी चेन्नईतल्या एका प्रसिद्ध शाळेत शिक्षण घेत होती. रिपोर्ट्सनुसार, ती तणावाखाली होती आणि त्यासाठी तिच्यावर उपचार सुरू होते. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिलं आहे.
घरातल्या मदतनीसाला अभिनेत्याची मुलगी मृतावस्थेत आढळून आली होती. तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारा आधीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. विजयच्या कुटुंबाबद्दल सांगायचे तर, पत्नी फातिमा आणि दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. विजय अँटोनी टॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता असून त्याचं स्वत: चं प्रॉडक्शन हाऊस देखील आहे.
Discussion about this post