जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या नावे बनावट व्हॉटसअप अकाउंट तयार करण्यात आले असून याबाबत नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या नावे ७२०७८६७१५६ या मोबाईल क्रमांकावरून बनावट व्हॉटसअप अकाउंट तयार करण्यात आले असून त्यावर प्रा. माहेश्वरी यांचा फोटो आहे. वास्तविक हा क्रमांक प्रा. माहेश्वरी यांचा नाही. या क्रमांकावरून काही संदेश आल्यास अथवा पैशाची मागणी झाल्यास कोणत्याही प्रकारे पैसे पाठवू नये असे आवाहन या निवेदनाद्वारे करण्यात येत आहे. याबाबतीत पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
Discussion about this post