जळगाव : भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकुन बनावट देशी मद्याची निर्मिती करतांना ०१ आरोपीला अटक करुन महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आली आहे. त्याच बरोबर 46 लाख 37 हजार पाचशे एवढ्या किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशी माहिती जळगाव जिल्हाधिकारी राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांनी सांगितले.
हा अवैध बनावट मद्यसाठा मिळून आल्याने मोठ्या प्रमाणात आंतरराज्य मद्य तस्करांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे त्याबाबतचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक अं. व दक्षताप्रसाद सुर्वे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आल्याचे भुकन यांनी सांगितले.
या कार्यवाहीत जिल्हा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन, भुसावळचे विभागीय निरीक्षक सुजित ओं. कपाटे, निरीक्षक अन्वर खतीब यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.
Discussion about this post