मुंबई । भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओवरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं असून याचे पडसाद विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले आहे. दरम्यानं या सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून या प्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी केली जाईल असं फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जो विषय मांडला आहे तो गंभीर आहे. राजकारणात अनेक प्रसंग येत असतात. माझं म्हणणं आहे की माझ्याकडे पुरावे द्या. कोणालाही पाठिशी घालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कुठलंही प्रकरण दाबलं जाणार नाही. सखोल आणि वरिष्ठ स्तरावरील चौकशी केली जाईल.”
विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, “काही लोक ईडी सीबीआयच्या माध्यमातून विरोधी पक्षांतील नेत्यांना भीती दाखवतात आणि दुसरीकडे आपल्या केंद्रीय यंत्रणेत ओळखी असून महिलांशी संपर्क करत असल्याचं समोर आलं आहे. महामंडळात नियुक्त्या देतो, विधानपरिषदेवर घेतो असं सांगितलं जातं आणि एक्स्टॉर्शन केलं जातं. असच अनेक नेत्यांना देखील ईडी, सीबीआयचे धाक दाखवून पैसै मागितले जातात. अनेक महिलांनी मला येऊन माहिती दिली आहे. 8 तासांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. हा व्यक्ती extortion करत आहे. असे उपरे दलाल महाराष्ट्रात येतात आणि महिलांना त्रास देतात. किरीट सोमय्या त्यांचं नाव आहे. माता भगिनींना त्रास देणाऱ्या किरीट सोमय्यांना सरकार सुरक्षा देणार का? मी त्याचा पेन ड्राईव्ह आपल्याला देतो. हा माणूस पुन्हा मुंबई पोलिसांना पत्र लिहितो आणि चौकशी करा म्हणतो.”
Discussion about this post