मुंबई । २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी (HSRP) नंबरप्लेट बसवणे बंधनकारक असणार असून परंतु अनेकदा आपण राहतो एका शहरात आणि वाहन हे आपल्या गावी किंवा दुसऱ्या शहरात रजिस्टर असते. त्यामुळे एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी रजिस्ट्रेशन असलेल्या शहरात जावे लागणार होते. मात्र, हा त्रास वाचावा म्हणूनफडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता दुसऱ्या शहरांमध्ये नोंदणी असलेल्या आणि पुण्यात (Pune) राहणाऱ्या वाहनमालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता हे वाहनधारक पुणे शहरातील नोंदणी केंद्र निवडू शकतात.
देशातील वाहन कंपन्यांना २०१९ पासून सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट देणे अनिवार्य केले आहे. मात्र, ज्यांनी २०१९ पूर्वी वाहन खरेदी केल्या आहेत त्यांनादेखील ही नंबरप्लेट बसवणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर एचएआरपी प्लेट बसवू शकतात.
पुण्यात)२५ लाख वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. आतापर्यंत एक लाख ४२ हजार वाहनांनी सुरक्षा नंबरप्लेटसाठी अर्ज केले आहेत. आतापर्यंत ३२ हजार वाहनांना या नंबरप्लेट बसवल्यादेखील आहेत.
Discussion about this post