जळगाव । जळगावमधून अल्पवयीन मुलावर झालेल्या अनैसर्गिक कृत्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलाचा अश्लील व्हिडीओ तयार करून तो व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितली. याबाबत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या.
शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि किशोर पवार, पोहेकों भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धाडे, अमोल ठाकूर यांनी अवाच्या काही तासात सोनू उर्फ बंटी रुपेश प्रभू बनसोडे (वय १९, रा. इंद्रप्रस्थनगर), सुरज गणेश परदेशी (वय २१, रा. त्रिभूवन कॉलनी) व अजय लक्ष्मण गरुड (वय ४०, रा. गेंदालाल मिल) या तिघांना अटक केली तर त्यांचा एक साथीदार फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली
शहरातील एका परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा वास्तव्यास असून तो कॉमर्सचे शिक्षण घेतो. एकलव्य स्टेडीयम येथे पोहणे शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाची सोनू नावाच्या तरुणाशी ओळख निर्माण झाली. १७ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास त्या मुलाची नेहरू चौकात भेट झाली. यावेळी सोनू नावाच्या मुलाने त्या अल्पवयीन मुलाला हात देवून थांबवले.
ते गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरातबोलत असतांना तेथे त्याचे तीन अनोळखी मित्र आले.त्यांनी अल्पवयीन मुलाला धमकी देऊन खान्देश कॉम्पलेक्स परिसरातनेऊन त्याठिकाणी अंगावरील कपडे काढून त्याच्यासोचतअश्लिल कृत्य करण्यास सांगत होते. यावेळी त्याचा व्हीडीओ तयार करण्यात आला. हा व्हीडीओ व्हायरल करुन पोलिसांना तू चुकीचे काम करतो अशी धमकी देण्यात आली . त्या मोबदल्यात त्या तरुणांनी मुलाकडे ३० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. याप्रकरणी सुरज परदेशी यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post