जळगाव | महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थश्रेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासना मार्फत करण्यात येणार असून जळगाव जिल्हयासाठी 1000 व्यक्तींना याचा लाभ देण्यात येणार आहे. पहिल्या टप्यासाठी श्रीराम मंदिर, अयोध्या हे तीर्थक्षेत्र निश्चीत करण्यात आलेले आहे.
या योजनेचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत किंवा सहायक आयुक्त, समाज, कल्याण, कार्यालय पत्ता: डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड, जळगाव जळगाव येथे सादर करावेत. सदर योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यासाठी अर्ज करण्याची अंतीम मुदत ही दिनांक 13 सप्टेंबर, 2024 रोजी सायंकाळी 06.00 वाजेपर्यत देण्यात आली होती.
परंतू सदर मुदत दिनांक 18 सप्टेंबर, 2024 पर्यत वाढविण्यात येत आहे. योजनेसाठीचे अर्ज गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी व सहायक आयुक्त कार्यालयात उपलब्ध आहेत. उदिष्टापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थ्याची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येईल. दिनांक 18 सप्टेंबर, 2024 पर्यत 60 वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरीकांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.
Discussion about this post