मुंबई । दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी आरबीआयने मुदत वाढवलीये. आता तुम्ही ७ ऑक्टोबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकता. त्यामुळे नोटा बदलून घेण्यासाठी आणखी आठवड्याभराचा अवधी मिळालाय.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर २३ मेपासून नोटा बँकेत जमा करण्यास सुरुवात झाली. याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर देण्यात आली होती. मात्र तरीही अनेक व्यक्तींनी आपल्या नोटा बदलेल्या नाहीत. नोटा चलनातून बाद झाल्यावर त्या व्यवहारात नसतील. यात कुणाचेही नुकसाना होऊ नये म्हणून आरबीआयकडून ही मुदत आणखीन वाढवण्यात आली आहे.
२००० रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यास सांगितल्यावर अनेक ठिकाणी या नोटा स्विकारणे बंद करण्यात आले. शॉपींग मॉल्ससह, गोल्ड शॉप आणि देवळातही दान करताना २ हजारांच्या नोटा स्विकारल्या जाणार नाहीत असे सांगण्यात आले होते.
Discussion about this post