जळगाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये / परिसंस्था व प्रशाळा यामध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता प्रवेश घेण्यासाठी १९ ऑगस्ट, २०२३ पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.
या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याचा कालावधी ३१ जुलै पर्यंत देण्यात आला होता. काही विद्यार्थ्यांचे पुर्नमूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्याची कार्यवाही परीक्षा विभागाकडून सुरु आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये जावून प्रवेशासाठी प्राचार्यांकडे विनंती केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेवून प्रवेशासाठी आता १० ऑगस्ट ऐवजी १९ ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
Discussion about this post