भोपाळ । मध्यप्रदेशातील राजधानी भोपाळमध्ये दोन मुलांसह पती- पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. भोपाळच्या रातीबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून या सामूहिक आत्महत्येचे धक्कादायक कारण पोलीस तपासात समोर आले आहे.
पती-पत्नीने अगोदर ८ वर्षाच्या मुलाला आणि नंतर ३ वर्षाच्या मुलाला सल्फासच्या गोळ्या खायला दिल्या. त्यानंतर, पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी पीडित व्यक्तीने सुसाईड नोट लिहली होती तसेच पोलिसांना घटनास्थळी सेल्फॉसच्या गोळ्याही आढळून आल्या आहेत.
धक्कादायक कारण समोर..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती एका खासगी इन्शुरन्स कंपनीसाठी काम करत होता. मात्र, आर्थिक नुकसान झाल्यामुळे ते फेडण्यासाठी त्याने कर्ज काढले होते. मात्र, कर्ज काढल्यानंतर तो अधिकच कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला. कर्जाचे हफ्ते थकत गेले आणि कर्ज वाढत गेल्यामुळे अखेर पीडित व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
Discussion about this post