जळगाव । जळगाव जिल्ह्यातून आणखी एका लाचखोरीची घटना समोर आली असून त्यात दहा हजारांची लाच मागून ती खासगी पंटरामार्फत स्वीकारताना रावेर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक विजय पाटील व खासगी पंटर भास्कर चंदनकर यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.
ही कारवाई रावेर तालुक्यातील खानापूर येथे करण्यात आली. या घटनेमुळे उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराच्या वडिलांवर यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई झाली होती. पुढील कारवाई टाळण्यासाठी दुय्यम निरीक्षक विजय पाटील यांनी दहा हजारांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने नोंदवली. एसीबीकडे तक्रार त्यानुसार एसीबीने सापळा रचला. लाचेची रक्कम थेट न स्वीकारता ती खासगी पंटर भास्कर चंदनकर यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले.















Discussion about this post