बीड | शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याने दोन गट तयार झाले. दरम्यान, अजित पवारांसोबत गेलेले आणि सध्या राज्याचे मंत्री राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा बीड हा बालेकिल्ला आहे. आणि फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच बीडमध्ये येत असून धनंजय मुंडे यांना चेकमेट देण्यासाठी या मतदारसंघात येत असल्याचं सांगितलं जात आहे. पवार यांची दुपारी सभा सुरू होईल. त्यापूर्वीच धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे.
परळी येथील धनंजय मुंडे यांचे खंद समर्थक बबन गित्ते हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. बबन गित्ते यांचं बीडमध्ये मोठं प्रस्थ आहे. ते मुंडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. मात्र, मुंडे मंत्री असूनही गित्ते यांनी त्यांची साथ सोडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
गित्ते हे दुपारी शरद पवार यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यावेळी गित्ते यांचं भाषण होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. गित्ते यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे मुंडे यांना मोठा चेकमेट असल्याचं बोललं जात आहे. बबन गित्ते हे धनंजय मुंडे यांच्यासमोरचा नवा पर्याय असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात धनंजय मुंडे यांनी डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Discussion about this post