कर्मचारी राज्य विमा निगममध्ये भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. टीचिंग फॅकल्टी पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.विशेष या नोकरीसाठी कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही. उमेदवारांची निवड थेट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.
ईएसआयसी (ESIC)मध्ये प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर (स्टॅटस्टिशन) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
ईएसआयसीने एकूण ५२ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू २८ आणि २९ तारखेला होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी या मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. याबाबत अधिक माहितीसाठी esic.gov.in वेबसाइटवर जा.
पात्रता:
या नोकरीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमडी, एमएस, डीएनबी पूर्ण केलेले असावे. याचसोबत विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी असणार आहे. या नोकरीसाठी टीचिंगशिवाय इतर क्षेत्रात कामाचा अनुभव असावा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ६९ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
कर्मचारी राज्य विमा निगममध्ये प्रोफेसर पदांसाठी उमेदवारांना 2,55,960 रुपये पगार मिळणार आहे. असोसिएट प्रोफेसर पदासाठी 1,70,208 रुपये पगार मिळणार आहे. असिस्टंट प्रोफेसर पदासाठी 1,46,232 रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपयांचे डिमांड ड्राफ्ट बनवावा लागणार आहे. या नोकरीसाठी इंटरव्ह्यूसाठी सकाळी ९ ते १०.३० वाजेपर्यंत उपस्थित राहायचे आहे. अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या.
Discussion about this post